Posts

Showing posts from April, 2021

पुण्यात लॉ कॉलेज रोडवर वीजेचा धक्‍का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

पुणे : रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डिपीमध्ये हात घातल्याने वीजेचा जबर धक्का बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरीसमोरील पदपथावर घडला. किरण राजकुमार (रा.त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण राजकुमार त्रिवेंद्रम येथील एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत होता. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्याने तसेच त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याला कामावरुन कमी करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो लॉ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरीसमोरील पदपथावरून स्वतःशी बोलत जात होता. त्यावेळी त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डीपीचे दरवाजे उघडले. त्यानंतर त्याने स्वतःचे दोन्ही हात डिपीमध्ये घातले. त्यामुळे त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्यामुळे तो पदपथावर पडला. ही घटना तेथून जाणाऱ्या नागरीकांनी पाहिली. त्यांनी याबाबत तत्काळ डेक्कन पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांन...